पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन विभागाच्या वतीने 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘उत्क्रांती-एक प्रवास’ या कार्यक्रमातंर्गत विविध उपक्रम, चर्चासत्रे आणि प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात ‘एजन्ट बेस्ड मॉडेलिंगचा वापर करून नैसर्गिक घटनांचे अनुरूपन कसे करावे’ या विषयावर हर्षल ह्यातनगरकर आणि जयंत क्षीरसागर संवाद साधणार आहेत तर दुपारच्या सत्रात विज्ञान म्हणजे काय?उत्क्रांती म्हणजे काय? समाजासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनाचे महत्व काय? या विषयावर राष्ट्रीय शिपिंग बोर्डाचे अध्यक्ष प्रदीप रावत संवाद साधणार आहेत.
आपण आपल्या प्रतिजैविकांचा डोस पूर्ण का केला पाहिजे? ज्ञानेंद्रिये आपल्याला कशी फसवू शकतात? एखादे परदेशी झाड किंवा पाळीव प्राणी ठेवणे का अयोग्य आहे? आपल्याला पडणाऱ्या या प्रश्नावर पोश्टर प्रदर्शन आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत.
उत्क्रांतीविषयी अधिकाधिक माहिती समाजापर्यंत पोहचवता यावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक हर्षित अग्रवाल यांनी दिली आहे.
– विष्णू नाझरकर,
कॉलेज रिपोर्टर,
राज्यशास्त्र विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ