डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड विधानसभा निवडणुका 2022 चा निर्णय कॉंग्रेसच्या बाजूने असेल असा दावा कॉंग्रेस नेते हरीश रावत यांनी मंगळवारी केला. एएनआयशी बोलताना ते म्हणाले, “एक्झिट पोलची मतमोजणीच्या निवशी एक्झिट झालेली दिसेल. आम्हाला लोकांच्या भावना चांगल्या कळतात, त्यांनी कॉंग्रेसला मत दिले आहे, निर्णय कॉंग्रेसच्या बाजूने असेल असे ते म्हणाले.
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी मंगळवारी सांगितले की, भारतीय जनता पक्षच राज्यात पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याने कॉंग्रेस नेते काही दिवसांसाठी रणशिंग फुंकतील त्यांच्या या कांगाव्याला काही अर्थ नाही. एक्झिट पोलने स्पष्ट केलेले अंदाज नाकारल्याबद्दल धामी यांनी कॉंग्रेस नेत्यांवर टीका केली.
निवडणुकीत कॉंग्रेस कुठेही नव्हती. लोकांसमोर मांडण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नव्हते. आता निवडणुका संपल्या असून, निकाल लागेपर्यंत ते रणशिंग फुंकतील, कारण भाजप 10 मार्चला विजयाचा आनंद साजरा करणार आहे,असे प्रत्युत्तर धामी यांनी त्यांना दिले आहे.