– अभय कुलकर्णी
उद्योगी लोकांचा देश असणार्या जपानमधील अनेक कंपन्यांनी जागतिक पटलावर आपला वरचष्मा निर्माण केला आहे. तोशिबा ही यापैकीच एक कंपनी. टीव्ही, संगणक, स्पीकर यांसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात तोशिबाची दादागिरी होती. जपानी तंत्रज्ञानाचा मेरुमणी म्हणून या कंपनीकडे पाहिलले जात होते. पण आजही कंपनी जपानी शेेअर बाजारामध्ये राहण्यास अपात्र ठरली आहे. तब्बल 74 वर्षे जपानी शेअर बाजारातील एक दिग्गज कंपनी म्हणून आपले भक्कम स्थान कायम ठेवणार्या तोशिबाचे नाव टोकियो स्टॉक एक्सचेंजमधून काढून टाकण्यात आले आहे. तोशिबाची ही घसरण का झाली?
जपान हा उद्योगी लोकांचा देश म्हणून जगभरात ख्यातकिर्द आहे. नागासाकी आणि हिरोशिमा या दोन शहरांवर अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बमुळे बेचिराख झालेल्या जपानने या उद्योगीपणाच्या आणि नियोजनबद्ध धोरणांच्या साहाय्याने ङ्गिनिक्स पक्षासारखी आर्थिक भरारी घेतली आणि जागतिक अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानावर हा देश जाऊन बसला. आज चीनी बनावटीच्या वस्तूंच्या गुणवत्तेबाबत जशी नकारात्मकता जगभरात आढळते, त्याउलट स्थिती जपानी तंत्रज्ञानाबाबत आणि निर्मितीबाबत, गुणवत्तेबाबत पाहायला मिळते.
त्यामुळेच जगभरात ‘मेड इन जपान’ वस्तू वापरणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या क्षेत्रापासून अनेक क्षेत्रात जपानी कंपन्यांनी आपला दबदबा निर्माण केलेला होता. तोशिबा ही यापैकीच एक कंपनी. एकेकाळी जपानमध्येच नाही तर जगभरात इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या क्षेत्रात या कंपनीने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. परंतु आज ही कंपनी रसातळाला पोचली आहे. परिणामी तिचे नाव टोकिओ शेअर बाजारातून वगळण्यात आले आहे. दहा बारा नाही तर तब्बल 74 वर्षापर्यंत शेअर बाजारात दबदबा निर्माण करणार्या तोशिबाची एवढी पडझड का झाली?
1980-90 च्या दशकांत तोशिबाचा सर्वत्र गाजावाजा होता. या काळात अनेक देशांत दळणवळण आणि सुविधांचा विकास होऊ लागल्याने तोशिबाने अतिशय वाजवी किमतीत लोकांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे उपलब्ध करून दिली. त्यामुळे अल्पावधीतच या कंपनीची भरभराट झाली. मध्यम आणि उच्च वर्गीयांच्या घरात तोशिबाचे कोणते ना कोणते उत्पादन असायचे. मग टिव्ही असो, संगणक असो, स्पीकरसह अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण असो त्यात तोशिबाचे तंत्रज्ञान वापरलेले असायचे. जपानी तंत्रज्ञानाचे आदर्श उदाहरण म्हणून तोशिबाकडे पाहिले जात असत. पण आज ही कंपनी टोकियो स्टॉक एक्सचेंजमध्येदेखील तग धरू शकलेली नाही.
तोशिबाच्या आर्थिक स्थितीत गेल्या दहा वर्षात कमालीची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील तोशिबाच्या उपकरणांना मागणी घटल्याने आणि कंपनीत गैरव्यवहार आणि उलथापालथ होऊ लागल्याने कंपनी मालकांवर आता नव्याने सुरुवात करण्याची वेळ आली आहे. थोडेसे भूतकाळात डोकावल्यास, तोशिबाची अधोगती 2015 पासून सुरू झाली. यादरम्यान कंपनीच्या वेगवेगळ्या ब्रँच, यूनिटमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होऊ लागले. यात बड्या अधिकार्यांचे नाव देखील येऊ लागले. या प्रकरणात सखोलवर गेले असता नफ्याचे आकडे ङ्गुगवल्याचे निदर्शनास झाले. कंपनीने सात वर्षे सादर केलेले नफ्याचे आकडे प्रत्यक्षापेक्षा कैकपटीने कमी असल्याचे दिसून आले. तोशिबाला होणारा प्रत्यक्ष ङ्गायदा हा तुलनेने कमीच होता आणि तो ङ्गायदा वास्तवापेक्षा तब्बल 1159 अब्ज डॉलरपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले होते.
2020 मध्ये आणखी एक गैरप्रकार उघडकीस आला आणि त्याची पाळेमुळे कंपनीबाहेरही असल्याचे निष्पन्न झाले. कंपनीच्या प्रशासकीय पातळीवर देखील अनियमितता असल्याचे आढळून आले. समभागधारकांसाठी निर्णय घेताना देखील अनेक प्रकारच्या नियमबाह्य गोष्टी केल्याचे उघड झाले आहे. तोशिबाने देशाच्या वाणिज्य मंत्रालयाशी मिलीभगत करत परकी गुंतवणूकदारांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. तज्ज्ञांच्या मते, यासह अनेक कारणामुळे अनेक परकी गुंतवणूकदार जपानमध्ये गुंतवणूक करण्यास बिचकत होते आणि तोशिबाने केलेल्या गैरप्रकारामुळे जपानच्या शेअर बाजाराचे नुकसान झाले आहे.
एकामागून धक्के
जपानला भूकंपाचे नुकतेच धक्के बसले आहेत. परंतु तोशिबाच्या रुपातून गुंतवणूकदारांना अनेक धक्के सहन करावे लागले. अमेरिकेची वेस्टिंग हाऊस इलेक्ट्रिक कंपनी दिवाळखोरीत निघाल्यावर तोशिबाला धक्का बसला. वास्तविक 2016 मध्ये तोशिबाने एक अणुवीज प्रकल्प निर्मिती करण्याची घोषणा केली आणि 2015 मध्ये हा प्रोजेक्ट वेस्टिंग हाऊसने खरेदी केला होता. मात्र एक वर्षानंतर वेस्टिंग हाऊस दिवाळखोरीत निघाले आणि तोशिबाचा बहुचर्चित अणुऊर्जा प्रकल्पाचा व्यवसाय डब्यात गेला. या प्रस्तावित प्रकल्पापोटी झालेली सहा अब्ज डॉलरची उलाढाल अडचणीत सापडली. यासाठी ‘तोशिबा’ला मोबाईल ङ्गोन आणि मेडिकल उपकरणाचे यूनिटही विकावे लागले. तोशिबा मेमरी नावाने चिप तयार करणारी कंपनी बाजारात उतरली.
मात्र करारानंतरही अनेक महिने त्याचे काम पुढे सरकरले नाही. कारण या कंपनीचे अन्य भागीदार कंपन्यांंशी वाद झाले. त्यामुळे तोशिबासमोर आर्थिक अडचणी वाढतच गेल्या. एकीकडे जगभरातील कंपन्या भविष्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानात गुंतवणूक करत असताना नामांकित राहिलेल्या तोशिबाला पैसा उभारण्यासाठी मालमत्ता विकावी लागली. त्यानंतर तर कंपनी शेअर बाजारातून बाहेर पडण्याच्या स्थितीत आली. मात्र 2017 मध्ये बुडत्या कंपनीला काडीचा आधार मिळाला. या वर्षी 514 अब्ज डॉलरची परकी गुंतवणूक मिळाली.पण त्याचा ङ्गारसा ङ्गायदा होऊ शकला नाही. या चढउतारामुळे कंपनीवर विक्री करण्याची वेळ आली आणि जून 2022 मध्ये आठ खरेदीदारांचे प्रस्ताव आले आणि शेवटी 2023 च्यंा प्रारंभी जपानचा गुंतवणूक समूह इन्वेस्टमेंट कॉर्पने तोशिबाची 14 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली.
भवितव्य कसे असेल?
तोशिबाची खरेदी जपान इंडस्ट्रियल पार्टनर्स (जेआयपी) समूहाने केली. या कंपनीची ङ्गायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी ऑरिक्ससह चुबू इलेक्ट्रिक पॉवर आणि संगणकाची चिप तयार करणारी कंपनी रोममध्ये गुंतवणूक आहे. ‘जेआयपी’ने सोनी कंपनीसाठी लॅपटॉप तयार करणारी कंपनी आणि ऑलिंपिसच्या कॅमेरा तयार करणार्या कंपनीत देखील गुंतवणूक केली आहे. 2014 मध्ये जेआयपीने सोनीच्या ‘वायो लॅपटॉप’ची खरेदी केली. या व्यवहारानंतर ही कंपनी तात्काळ ङ्गायद्यात पोचली.
परंतु तोशिबातील नव्या गुंतवणूकदारांना नव्या प्रकल्पाची माहिती देण्याच्या अगोदरच ही कंपनी सोडून जाणार्या अध्यक्षांनी नव्या मालकाचे लक्ष डिजिटल सेवेकडे असणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे गुंतवणूकदारांसमोर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत. अर्थात तोशिबा ही मोठी कंपनी असून तिच्यासमोरची आव्हाने देखील तशीच आहेत. एक लाखांपेक्षा अधिक कर्मचारीसंख्या असलेल्या कंपनीने जपानची आर्थिक आणि सामरिक समृद्धीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच नागरिकांचे,गुंतवणूकदारांचे या कंपनीवर बारीक लक्ष असेल.