मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे, मी सुद्धा वंशवादाचे प्रतिक आहे. पण मला कोणीही संपवू शकत नाही, पंतप्रधान मोदीही मला संपवू शकत नाहीत. कारण मी तुमच्या मनात आहे. जोपर्यंत मी तुमच्या मनात आहे तोपर्यंत मला कुणीही संपवू शकत नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलेच वातावरण तापले आहे. यावर आता पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत सगळ्यावर स्पष्टीकरण दिल आहे.
“मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम केले. त्यात ‘बुद्धिजीवी संमेलन’मधील माझ्या भाषणाच्या highlights… आपल्यापर्यंत एक ओळ आलीच आहे. ‘सनसनीखेज’ बातम्यांतून जमले तर हे ही पहा, मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या link वर आहेच”, असं पंकजा आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट