इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना शांततेचा नोबेल

लंडन : २०१९चा शांततेचा नोबेल पुरस्कार इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना घोषित करण्यात आला. शांततेचा नोबेल मिळवणारे ते पहिले इथिओपिअन आहेत. यंदाचा हा शंभरावा नोबेल शांती पुरस्कार आहे. इथिओपियाचा शेजारी देश इरिट्रियासोबतचा सीमावाद सोडवण्यासाठी निर्णायक पुढाकार घेतल्याप्रकरणी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

“शांतता प्रस्थापित केल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी तसेच शेजारील देश इरिट्रियासोबत असलेला सीमावाद सोडवण्यासाठी घेतलेल्या निर्णायक पुढाकारासाठी अबिय यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. इरिट्रियाचे राष्ट्राध्यक्ष इसाईअस अफवेरकी यांच्या सहकार्यामुळे अबिय अहमद यांना कमी वेळेत शांतता करारावर काम करता आले,” असेही नोबेल समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.