मंचर- मंचर शहरातील ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड नाही त्यांना गरज आहे शहरातील अशा कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट मोफत दिले जाणार आहे. समाजातील दानशूर किंवा ज्यांना मदत करावयाची असेल त्यांनी मंचर ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन सरपंच दत्ता गांजाळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
कठीण प्रसंगात गरीब आणि गरजूंना मदत करण्याची वेळ मंचरकरांवर आली आहे. मंचर शहरातील हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरीब कुटुंबांसाठी (रेशनकार्ड नसेलला) जीवनावश्यक किराणा व इतर वस्तू मोफत वितरित केल्या जाणार आहेत. किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे 10 दिवस पुरेल असे किट गरीब कुटुंबांना वाटप केले आहे. आपण गरीब कुटुंबांसाठी एक मदतीचा हात देऊ शकता, या संकल्पनेतून मोफत जीवनावश्यक वस्तू वाटप योजना तयार केली आहे. यासाठी आपल्या वॉर्डातील सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले आहे.