मुंबई – अभिनेता रणवीर सिंह न्यूड फोटोशूटनंतर चांगलाच चर्चेत आला होता. रणवीरच्या पावलावर पाऊल ठेवत एका अभिनेत्रीने देखील असेच काहीसे फोटूशूट केले आहे. अभिनेत्री एरिका पॅकार्ड सध्या आपल्या टॉपलेस फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. एरिका ही खतरोंके खिलाडीच्या १२ व्या सिझननंतर चांगलीच चर्चेत आली होती.
अभिनेत्रीने टॉपलेस होऊन काही फोटोज काढले आहे.ज्यात तिने केवळ जीन्स परिधान केली आहे. एका हाताने साईडबाजू कव्हर करत एरिकाने थेट कॅमेऱ्यात पाहून पोज दिली आहे. एरिकाने हे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत एक मजेदार कॅप्शन देखील लिहिले आहे. कॅप्शनमध्ये ती लिहिते, “रणवीरला कंपनी देणार आहे पण तुम्ही माझी बम पाहू शकत नाही. ”
View this post on Instagram
एरिकाच्या चाहत्यांनी या तिच्या फोटोवर भरमसाट प्रश्न विचारले आहेत. काहींना तिला असे फालतू काम न करण्याचा सल्ला दिला आहे तर काहींनी थेट रणवीर कोठे आहे असा सवाल केला आहे.रणवीरने केलेल्या फोटोशूटनंतर त्याच्यावर सर्व स्तरातून टीका झाल्याचे पाहायला मिळाले होते. काहींनी एरिकाच्या या धाडसाचे कौतुक देखील कमेंटमध्ये केल्याचे पाहायला मिळते.