लंडन : आयुष्यात अनावधानाने केलेल्या चुका कशा नुकसानदायक ठरू शकतात याचा अनुभव सध्या इंग्लंडमधील एक तरुण घेत आहे. जेम्स होवेल असे या तरुणाचे नाव असून त्याने दहा वर्षापूर्वी अनावधानाने आपल्या संगणक यंत्रणेतील एक हार्डड्राइव्ह कचराकुंडीत फेकली होती. या हार्ड ड्राईव्हमध्ये त्याच्या बिटकॉइनची नोंद होती 2013 मध्ये त्याने 8000 बिटकॉइन अतिशय कमी दरात खरेदी केले होते. या व्यवहाराची नोंद ज्या हार्ड ड्राईव्हमध्ये करण्यात आली होती.
तो त्याने नजरचुकीने शहरातील कचरा कुंडी साठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या खड्ड्यात फेकला आज एका बिटकॉइनची किंमत सुमारे 18 लाख रुपये असल्याने जेम्स हा चौदाशे कोटी रुपयांचा मालिक आहे, पण या बाबतचा कोणताच पुरावा त्याच्याकडे नसल्याने तो या पैशाचा वापर करू शकत नाही. नुपोर्ट शहरातील नगर परिषदेला त्याने या कचराकुंडीत आपल्या हार्ड ड्राइव्ह चा शोध घेण्यासाठी अर्ज केला आहे.
10 वर्षापूर्वी फेकलेली एखादी वस्तू अशा मोठ्या खड्ड्यातून शोधणे पर्यावरणासाठी हानिकारक असू शकते अशी भूमिका घेऊन नगरपरिषदेने त्याला अद्याप परवानगी दिलेली नाही त्याला नगरपालिकेने परवानगी दिली तर बिटकॉइन मधील गुंतवणुकीतील जे पैसे मला उपलब्ध होतील, त्यातील दहा टक्के पैसे मी नगरपालिकेला देईल अशी ऑफरही दिल्ली पण अद्याप नगरपालिकेने त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. जेम्सने मोठे प्रयत्न करून ती शोधली तरी ती ऊपयुक्त असेल की नाही याबाबत तज्ञांनाही शंका आहे, त्यामुळे आपली गुंतवणूक सिद्ध करण्यासाठी जेन्सने इतर पर्यायांचाही वापर करावा असे सुचवण्यात आले आहे.