Salman Khan| बॉलीवूडचा ‘दबंग’ अर्थात सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. यानंतर आता तो ‘सिकंदर’ चित्रपटात दिसणार आहे. सलमान खानने या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर चाहते त्याच्या आगामी चित्रपटाबाबत फारच उत्सुक आहेत. सध्या सोशल मीडियावर सलमानचा एक फोटो व्हायरल होत आहे.
संगीत दिग्दर्शक साजिद खानने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये साजिद खानने लिहिले की, “माझ्या भावासोबत घालवलेला वेळ हा सर्वोत्तम काळ होता. बऱ्याच दिवसांनी पनवेलमधील सलमान खानच्या फार्म हाऊसवर भेट घेतली.” विशेष म्हणजे यातील सलमानचा बियर्ड लुक हा सिकंदर चित्रपटातील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप या चित्रपटातील सलमानच्या लुकबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
View this post on Instagram
‘सिकंदर’चे दिग्दर्शन एआर मुरुगदास यांनी केले आहे. त्याचे शूटिंग सध्या सुरू होणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदान्नाही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करत आहेत. सलमान खान 2025 सालच्या ईदच्या दिवशी हाॲक्शन चित्रपट घेऊन येत आहे. 2014 मध्ये आलेल्या ‘किक’ या चित्रपटानंतर सलमान खान आणि साजिद नाडियादवाला पुन्हा एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत.
हेही वाचा:
“…तर भारत हिंदू राष्ट्र झाले असते” ; टी.राजा सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य