मुंबई – बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता . अतिशय हरहुन्नरी आणि अष्टपैलु अभिनेता अशी ओळख असणाऱ्या इरफान खान यांच्या निधनावर बॉलिवूड सेलिब्रिटी ते राजकीय मंडळी अशाविविध क्षेत्रातील सर्वांनी दुःख व्यक्त केले आहे.
बॉलिवूड अभिनेता इरफान खानला जाऊन एक महिना पूर्ण झाला . यातच त्याची पती सुतापा सिकदरनं पुन्हा एकदा एक इमोशनल पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.
सुतापानं इरफानचे काही अनसीन फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, इथून खूप दूर प्रत्येक चूक किंवा बरोबरच्या पलिकडे एक रिकामं मैदान आहे. तिथे मी तुला भेटेन. जेव्हा आपला आत्मा त्या हिरवळीवर शांतपणे झोपलेला असेल आणि हे जग बोलून थकलेलं असेल. बस काही दिवसांचा तर प्रश्न आहे. मग आपण भेटू, गप्पा मारू.