कागदपत्रे व सुनावणी मुंबईत वर्ग करण्यास न्यायालयाची मंजुरी
पुणे: बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध प्रकरणाची कागदपत्रे आणि सुनावणी मुंबई येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयात वर्ग करण्यास येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी यापुढे मुंबईत होणार आहे.
आरोपी आणि जिल्हा सरकारी वकिलांनी सुनावणी वर्ग करण्यास विरोध केला होता. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळत एनआयएनेे केलेला अर्ज मंजूर केला आहे.