निवडणूक कर्मचाऱ्यांची तणावमुक्ती!

नाटिकेद्वारे प्रशिक्षण : पिंपरीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची संकल्पना

पिंपरी – निवडणुकीच्या कामाचे खूप टेन्शन असते, अशी अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेहमी तक्रार असते. त्यामुळे त्यांच्या मनात असणारा ताण कमी होऊन त्यांना टेन्शन फ्री करण्यासाठी छोट्या नाटिकेच्या माध्यमातून त्यांना निवडणुकीचे कामकाज समजून देण्यात आले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रक्षागृहात पार पडले. यामध्ये बावीसशे जणांनी भाग घेतला. पिंपरी विभानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी उंटवाल यांच्या संकल्पनेतून हे नाटक तयार करण्यात आले होते. निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावरील रचना कशी असते, केंद्रावरील वातावरण कसे ठेवायचे, निवडणूक सुरु असतानाची कर्तव्ये काय? याची सविस्तर माहिती त्यांना नाटिकेद्वारे देण्यात आली.

बऱ्याचदा मतदान केंद्रावर उमेदवार मतदान यंत्राची पूजा करण्यासाठी येतात. मात्र, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार असे करण्यास मनाई आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना हे या नाटकातून एका प्रसंगाच्या माध्यमातून सांगण्यात आले. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना अनेक प्रकारच्या शंका असतात, त्यांचे निरसन कसे करायचे हे या माध्यमातून सांगण्यात आले.

अंध, अपंग, मतदारांना मतदाना दरम्यान कशी मदत करायची, याचे प्रशिक्षण देखील देण्यात आले. पिंपरी निवडणूक कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या नाटकामध्ये सहभाग घेतला. वैशाली इंदाणी उंटवाल यांनी केंद्राध्यक्षाची भूमिका केली. या नाटकामुळे निवडणुकीच्या कामाचा भार काही प्रमाणात हलका झाल्याची प्रतिक्रिया निवडणूक कर्मचाऱ्यांनी नोंदवली.

गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी –
पिंपरी विधानसभा मतदारसंघात 399 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक ठिकाणी पाच कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांना काही अडचण आली, तर त्यासाठी दहा टक्के अतिरिक्त कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आयत्यावेळी होणारी गैरसोय टळणार आहे. तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या मतदारांची संख्या तीन लाख 53 हजार 545 इतकी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)