सातारा -जिल्ह्यात मंगळवारी सकाली ओल्ल्या करोना अहवालानुसार आठ जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये कराड तालुक्यातील म्हासोली येथील पाच जण, मायणी येथील दाम्पत्य, पाडळी (ता. खंडाळा) येथील एका तरूणाचा समावेश आहे. त्युाळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता 146 वर पोहचली आहे. त्याशिवाय खंडाळा तालुक्यातील अजनूज येथील महिला मुंबईतून आली असून तीही करोनाबाधित आहे. मात्र, तिची नोंद मुबईमध्ये झाल्याने सातारा जिल्ह्यात तिची गणना होत नाही.
सध्या सातारा येथे 25, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 10 व कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 33 असे एकूण 68 करोनाबाधित रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 66 जणांची लक्षणे विरहित किंवा सौम्य लक्षणे असून
उर्वरित 2 रुग्णांना मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित व्यक्तिंची संख्या 146 झाली आहे. यापैकी 69 जण उपचार घेत आहेत. 75 जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असलेला व लोणंद येथे मुंबईतून प्रवास करुन आलेला एक 33 वर्षीय पुरुष व मायणी (ता. खटाव) येथे अकोला येथून प्रवास करुन आलेले 55 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला तसेच कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील म्हासोली गावातील करोनाबाधित रुग्णाचे निकट सहवासातील 45 व 62 वर्षे वयाचे दोन पुरुष आणि 48, 35 व 60 वर्षे वयाच्या तीन महिला अशा एकूण आठ जणांचा अहवाल करोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
त्याचप्रमाणे मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेऊन आलेल्या खंडाळा तालुक्यातील 58 वर्षीय महिलेचा अहवाल करोनाबाधित आल्याने या महिलेला क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णावर मुंबई येथे उपचार झाल्याने तिची गणना मुंबई येथे केली असल्याने या जिल्ह्यात गणना केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात 56 जण, कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 32, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात 14, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात 12 व वाईच्या ग्रामीण रुग्णालयात 8 अशा एकूण 122 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एनसीसीएसकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.