नगर – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला इंग्रजीच्या पेपरपासून सुरुवात झालेली आहे. कॉपीमुक्त अभियानाला मात्र गालबोट लागलेले असून जिल्ह्यातील पाच ठिकाणी आठ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आलेले आहेत.
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी 66 हजार 908 विद्यार्थी बसले आहेत. 99 केंद्रांवर ही परीक्षेला सुरुवात झालेली आहे. आज पहिलाच इंग्रजीचा पेपर असल्याने परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसह पाकलकांची सकाळी अकरापासूनच लगबग सुरु होती.
प्रत्येकजण आपल्या पाल्याचा कोणत्या वर्गात नंबर आहे, याची सकाळी नऊ वाजताच शाळांमध्ये येऊन पाहणी करून जात होता. तर काहीजण दहाच्या सुमारास आल्यानंतर कोणत्या वर्गात नंबर आहे, याची पहाणी करताना दिसून येत होता. तसेच पाल्यांना परीक्षेला शुभेच्छा देण्यासाठी पालकांसह हितचितकही परीक्षा केंद्राजवळ दिसून येत होते. प्रत्येक विद्यार्थ्याची जिल्ह्यातील केंद्रांवर तपासणी केली जात होती.