नवी दिल्ली, दि.19- देशभरात प्रदीर्घ काळ लॉक डाऊन चालू आहे. त्यामुळे नागरिकांचे केस कापण्याचे प्रश्न वाढत चालले आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी नागरिकाकडून स्वत:च स्वतःच्या केसावर प्रयोग करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यासाठी आवश्यक उपकरणांना ई-कॉमर्स वरून मागणी वाढली आहे.
यामध्ये त्रिमर लेटर्स फेस स्क्रबर्स इत्यादींचा समावेश आहे काहींनी ट्रिमर च्या साह्याने डोक्यावरील संपूर्ण केस काढून टाकले पसंद केले आहे 4 मे रोजी अर्थ मंत्रालयाने ही कॉमर्सला पूर्ण परवानगी दिल्यानंतर केस कापण्याच्या उपकरणांना मागणी वाढू लागली आहे.
अगोदर ई-कॉमर्स जीवनावश्यक वस्तूंना परवानगी होती मात्र चार महिन्यानंतर इतर वस्तूंना ग्रीन आणि ऑरेंज हॉलमध्ये विकण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे ही कॉमर्सच्या व्यासपीठावरून बरेच नागरिक खरेदी करू लागले आहेत प्रत्यक्ष दुकानात जाऊन एखादी वस्तू खरेदी करताना वस्तू हाताळणे आणि पैशांचा देण्याघेण्याचा व्यवहार करणे यामुळे अनेकदा स्पर्श होतो त्यामुळे आगामी काळात हे ग्राहक शक्य तितक्या जास्त प्रमाणात वस्तू ई-कॉमर्स करून घेण्याची शक्यता आहे.
याबाबत पेटीएम मॉल या कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की वैयक्तिक वापराचे सेव्हर हेअर क्लिपर ट्रॅक्टर्स बियर्ड इत्यादीच्या मागणी मध्ये 50 टक्क्यांची वाढ झाली आहे याअगोदर अशा वस्तू खरेदी करण्याची नागरिकांना गरज वाटत नव्हती मात्र अशा वस्तू आता हाताशी बाळगणे आवश्यक झाले आहे .याचा साक्षात्कार सर्वात शहरातील नागरिकांना होऊ लागला आहे त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तूंना मागणी वाढली असल्याचे दिसून येते लवकरच देशभरातील परिस्थिती पूर्ववत होईल त्यानंतरही वी कॉमर्स कंपन्यांच्या व्यासपीठावरून खरेदी करण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे या कंपन्यांना वाटते.