नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ईडीने पुन्हा एकदा मद्य घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. अरविंद केजरीवाल यांना सहाव्यांदा ईडीने समन्स बजावले आहे. या प्रकरणी त्यांना १९ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी २ फेब्रुवारी रोजी पाचवे समन्स बजाविल्यानंतर ईडीने आज नवीन समन्स जारी केले आहेत. यापूर्वी केजरीवाल यांना २ नोव्हेंबर २०२३, २१ डिसेंबर २०२३, ३ जानेवारी २०२४, १८ जानेवारी २०२४ आणि २ फेब्रुवारी २०२४ला समन्स बजाविले होते.
मात्र, केजरीवाल यांनी सर्व समन्स बेकायदेशीर ठरवले होते. दरम्यान, अरविंद केजरीवाल ईडीच्या अनेक समन्सनंतरही तपास यंत्रणेसमोर हजर राहिले नाही. यासंदर्भात ईडीने न्यायालयात धाव घेतली होती.