चेन्नई – डीएमके खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांच्या ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी (10 ऑक्टोबर) 55 कोटी रुपयांच्या 15 स्थावर बेनामी मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत.
ईडीने निवेदनात म्हटले आहे की, “ए. राजा यांच्या विरोधात पीएमएलए अंतर्गत बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या बेनामी कंपनी कोवई शेल्टर्स प्रमोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर मिळवलेल्या 15 स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील 45 एकर जमीन ईडीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जप्त केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) न्यायिक प्राधिकरणाने 1 जून रोजी या आदेशाला मंजुरी दिली होती.