दुर्गामातेच्या मूर्ती बनविण्याची मरकळमध्ये लगबग

चिंबळी-भाद्रपदी बैलपोळा व नवरात्रोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने मरकळ परिसरात कुंभार वाड्यात मातीचे बैल व दुर्गामातेच्या मूर्ती बनविण्यासाठी कारागिरांनी लगबग सुरू आहे.

28 सप्टेंबर रोजी भाद्रपदी बैल पोळा सण व 29 रोजी घटस्थापना व नवरात्र उत्सव आला आहे. मरकळ येथील कुंभारवाड्यात मातीचे बैल, दुर्गामातेच्या मूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे कारागिर शुभांगी कुंभार यांनी सांगितले. खेड तालुक्‍यात दक्षिण भागातील तुळापूर, गोलेगाव, वडगाव, शेलगाव, मरकळ, सोळू, धानोरे, केळगाव, चिंबळी, मोशी, डुडूळगाव, चऱ्होली खुर्द परिसरातील शेतकरी वर्ग बैलपोळा सणाला बैलाची पूजा करण्यासाठी मातीचे बैल घेतात. एका बैल जोडीची किंमत एकशे एक ते दोन हजार रुपयांपर्यंत आहे. तसेच नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी परिसरात तरूण मंडळांच्या वतीने दुर्गा मातेच्या मर्तूीची प्राणप्रतिष्ठा करून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मरकळ येथील कुंभारवाड्यात दुर्गामातेच्या आकर्षक अशा जवळपास शंभर मूर्ती बनविल्या असून एका मूर्तीची किंमत पाच हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here