मागणी नसल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात घट

नवी दिल्ली -स्थानिक बाजारात मागणी कमी असल्यामुळे मंगळवारी सोन्याच्या दरात 235 रुपयांनी तर चांदीच्या दरात 660 रुपयांनी घट झाली.

भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार दिल्ली सराफामध्ये शुद्ध सोन्याचे दर 235 रुपयांनी कमी होऊन 32,980 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याच बरोबर स्टॅंडर्ड सोन्याचे दर 235 रुपयांनी कमी होऊन 32,810 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर गेले.

जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे; त्याचबरोबर उद्योग क्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे दिल्ली सराफात मंगळवारी तयार चांदीचे दर 660 रुपयांनी कमी होऊन 38,010 रुपये प्रति किलो झाले. चलन बाजारातील अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीच्या बाजारातही आगामी काही काळ तरी अस्थिरता रेंगाळण्याची शक्‍यता आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.