प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 -गणेशोत्सव सुरु असल्याने मासळीला मागणी खूपच कमी झाली आहे. त्यामुळे मासळीच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली असल्याची माहिती मासळी विक्री व्यापाऱ्यांनी दिली. त्यामुळे गणेश पेठेतील मासळी बाजारात आवकही घटली आहे. त्यातच मागणी कमी असल्याने दरामध्येही घसरण झाली आहे. खोल समुद्रातील मासळीची सुमारे 7 ते 8 टन, खाडीच्या मासळीची 400 ते 500 किलो, नदीतील मासळी 400 ते 500 किलो इतकी आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) :
पापलेट : कापरी1400-1500
मोठे1400-1500
मध्यम900-1000
लहान600-700
भिला400-450
हलवा550-600
सुरमई400-600
रावस लहान600
मोठा700
करली300-400
पाला1000-1200
वाम500-600
ओले बोंबील100-160
कोळंबी लहान240-280
मोठी320-480
जंबोप्रॉन्स1200-1300
किंगप्रॉन्स600-700
लॉबस्टर1400-1500
मोरी200-280
खेकडे200-280
चिंबोऱ्या550-600
मांदेली100-140
राणीमासा160-200
खाडीची मासळी खापी240-280
तांबोशी400-440
पालू200-240
बांगडा लहान140-180
खुबे100-140
लेपा120-180
वेळुंजी100-140
नदीतील मासळी रहू140-160
कतला160
मरळ360-400
शिवडा200-240
खवली280-300
आम्ळी100-160
खेकडे280-320
वाम500-550