जामखेड : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते फिरोज बागवान यांच्याकडून प्रभाग क्रमांक 10 मध्ये औषध फवारणी करून परिसर निर्जंतुक करून गोरगरीबांना किरणा व फळे वाटण्यात आली. सध्या जामखेड शहरात कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
त्यामुळे शहरात सध्या गेल्या 18 दिवसापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हाॅस्टस्पॅट जाहीर केले आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते फिरोज बागवान यांनी स्वखर्चाने प्रभागात औषध फवारणी करून निर्जंतुक केला. तसेच शंभर गरजूना आत्यावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आहे.