मुंबई – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील सोनालीने अभिनयाचा करिष्मा दाखवलेला असल्यामुळे तिचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन्स आहेत. कुणाल बेनोडेसोबत सोनालीने विवाह केल्यानंतर ती आपल्या कुटुंबावर देखील लक्ष देताना दिसून आली. सोनालीने नुकताच आपला पंजाबमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसते.
सोनाली आपल्या कुटुंबासह पंजाबमध्ये गेली आहे यावेळी तिने स्वतः ट्रॅक्टरवरून फेरफटका मारत शेताची सैर केल्याचे दिसून येते. यावेळी तिचा पतीही तिच्यासोबत होता. घरची शेती गहू असे कॅप्शन देत सोनालीने पती कुणालला शेती पाहण्याची इच्छा होती म्हणून फिरत असल्याचे आपल्या पोस्टमध्ये म्हंटल आहे.यावेळी तिने ट्रॅक्टर चालवण्याचा देखील मनसोक्त आनंद घेतल्याचे दिसून येते. सोनालीने शेअर केलेला हा व्हिडीओ फॅन्सला चांगलाच आवडत आहे.
लॉकडाऊन दरम्यान सोनाली आपल्या पतीसह अनेक दिवस दुबईमध्ये होती. आता मात्र ती पुन्हा एकदा शूटिंगमध्ये व्यस्त झाली आहे. ‘अप्सरा’ अशी ओळख असलेल्या सोनाली कुलकर्णीचा हा वेगळा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडत आहे. सोनालीला ट्रॅक्टरवर पाहून फॅन्स भलतेच खुश झाले आहेत. सोनालीने यावेळी वाघा बॉर्डरला देखील भेट दिल्याचे समजते.