मुंबई – अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ‘हिरकणी’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली की तिकीटगृहावर हाऊसफुलची पाटी झळकली तर दुसरीकडे सोनाली कुलकर्णी तिच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. ‘विक्की वेलिंगकर’ असं तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले.
या चित्रपट ट्रेलरवरून सिनेमाची उत्सुकता वाढलीय. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने या चित्रपटासह तिच्या अँकमिंग प्रोजेक्टबाबत तिने संवाद साधला.
दरम्यान,सोनाली कुलकर्णी वेबसीरिजबाबत म्हणाली, ‘मला वेबसीरिज करायला आवडतील, पण उगाच काहीतरी विशेष बोल्ड वैगरे आहे असे करण्यात मला इंटरेस्ट नाही. मी त्यात कंफर्टेबल नाही. उत्तम रोल आणि उत्तम प्रोडक्शन, उत्तम स्क्रिप्ट मिळाली तरच मला नक्कीच वेबसीरिजमध्ये काम करेन.’ असं ही तिने सांगितले.