सातारा – सातारा ते कास रस्त्यावर पॉवर हाऊस येथे माती घेऊन येणाऱ्या डंपरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात होऊन चालक शिवशंकर संभाजी भोसले (वय 30 सध्या रा. विलासपूर मूळ रा. लातूर) जागीच ठार झाला. याबाबत अधिक माहिती अशी की शिवशंकर भोसले शनिवारी दुपारी कास परिसरातून (एमएच 11 बीएल 2680) या डंपरमधून माती घेऊन साताऱ्याच्या दिशेने येत होते. दुपारी 1.30 च्या सुमारास पॉवर हाऊसनजीक डंपरचा ब्रेक फेल झाल्याने वाहन डोंगराला जाऊन थडकले.
हा अपघात इतका भीषण होता की त्यात चालक शिवशंकर भोसले जागीच ठार झाले. त्यांना नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात नेले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली नव्हती,