ऑनलाइन करंडक स्पर्धेची नांदी

यंदाच्या "सिम्बायोसिस करंडक' स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन

पुणे – महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्षांचा “श्रीगणेशा’ झाल्यानंतर कलाप्रेमी विद्यार्थ्यांना करंडक स्पर्धांचे वेध लागतात. मात्र, करोनामुळे सुरू झालेल्या ऑनलाइन शिक्षणपद्धतीबरोबर आता करंडक स्पर्धांचीदेखील ऑनलाइन नांदी झाली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात “सिम्बायोसिस करंडक’ स्पर्धेचे आयोजन ऑनलाइन होणार आहे. नाट्यगृहांमध्ये ऐकू येणारी “अरे करंडक कुणाचा’ ही आरोळी “व्हर्च्युअली’च दुमदुमणार आहे.

दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर महाविद्यालयांची कलामंडळे करंडक स्पर्धांच्या तयारीला लागतात. परंतु, यंदा शैक्षणिक वर्षच “व्हर्च्युअली’ सुरू झाले असल्याने करंडक स्पर्धांबाबत संभ्रमच होता.

सिम्बायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सिम्बायोसिस मराठी नाट्य मंडळाच्या वतीने सिम्बायोसिस नाट्यवाचन करंडक (सुमन नाट्यवाचन करंडक) स्पर्धेपासून करंडक स्पर्धांची सुरवात होते.

यंदा या स्पर्धांचे आयोजन लांबणीवर पडले होते. अद्याप महाविद्यालये सुरू होण्याबाबत साशंकताच असल्याने “यंदा करंडक स्पर्धा होणार की नाही?’ अशी चर्चा महाविद्यालयीन कलामंडळांमध्ये रंगली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.