पुणे – पुणे मेट्रो कार्डसाठी योग्य नाव सुचवा, बक्षीस मिळवा, असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले आहे. ज्याप्रकारे प्रत्येक वस्तूला एका विशिष्ट नावाने ओळखले जाते, त्याचप्रमाणे पुणे मेट्रोच्या प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या कार्डदेखील विशिष्ट नावाने ओखळले जाईल. ही संधी नागरिकांसाठी खुली केली गेली असू,न अधिकाधिक पुणेकरांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेतील नियम- -स्पर्धा सर्वांसाठी खुली प्रवेशिका contest@punemetrorail.org या ई-मेलवर ऑनलाइन पद्धतीने आपले नाव, फोन नंबर, पत्ता यासह पाठवावी पुणे मेट्रो कार्डसाठी नाव मराठी किंवा इंग्रजीमध्येच स्वीकारले जाईल स्पर्धकाने पुणे मेट्रो कार्डसाठी सुचविलेल्या नावाचे महत्व सुस्पष्ट लिहून सादर करावे स्पर्धा 16 नोव्हेंबरपर्यंत खुली विजेत्यास योग्य पुरस्कार दिला जाईल