पुणे : वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसच्या वतीने टिळक महाराष्ट्रविद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांना ‘वुमन इन एज्युकेशन लीडर्स’ पुरस्कार जाहीर झाला होता. तसेच टिमवि ला ‘उत्कृष्ट शैक्षणिक ‘पुरस्काराने सन्मा नित करण्यात आले. त्याचे वितरण नुकतेच मुंबई येथे झाले.
‘परवडणा रे आणि शाश्वत शिक्षण ‘हि संकल्पना या पुरस्काराची होती. शैक्षणी कक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. शैक्षणिक क्षेत्रातील धोरणात्मक दृष्टिकोन, सचोटी व नैतिकता, शाश्वत शिक्षणाची क्षमता, बदलत्या काळा नुसार अभ्यासक्रमांचे मूल्यमापन करण्याचा दृष्टिकोन,
त्यांच्या कामाच्या गुणवत्तेसाठी ग्रामीण भागातील पोहोच आणि दृष्टिकोन आणि सामाजिक बदलासाठी मोलाचे योगदान देण्याची क्षमता शैक्षणिक दर्जा, प्लेसमेंट, नेतृत्व, पायाभूत सुविधांमध्ये सर्वोत्तम , भविष्यातील अभिमुखता , विद्यार्थी केंद्रित पद्धती इत्यादी निकषांवर पारितोषिक देण्यात आले.
जागतिक स्तरावरील नामांकित व्यक्तींचा समावेश असलेली समिती हि निवड करते. प्रा . इंदिरा पारेख (माजी डीन आय. आय. एम. अहमदाबाद ), डॉ . अरुण अरोरा (कार्यकारी अध्यक्ष – वर्ल्ड एच.आर. डि. काँग्रेस ) ,डॉ . सौ गता मित्र (संचा लक -नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ), डॉ. आर. एल. भाटिया (संस्था पक -जा गतिक सी . एस. आर. काँ ग्रेस ) आदी नामवंताचा या समितीमध्ये समावेश आहे.
लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण या विचारधारेला सामोरे ठेऊन शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल केलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने द्वितीय शतकात पदार्पण केले आहे. टिमविमध्ये पारंपरिक शिक्षणाला आधुनिक विद्या शाखांची जोड दिली आहे. बदलत्या शैक्षणिक , सामाजिक पर्यावरणात पारंपरिक शिक्षणा बरोबर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आधुनिक पद्धतीने अभ्यासक्रम टिमविमध्ये राबविले जातात. आय. एस. ओ. २१००१:२०१ हे प्रमाणपत्र मिळविले आहे.