बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे नाव गेल्या काही वर्षांपासून रिया चक्रवर्तीशी जोडले जाते आहे. तथापि, त्यापैकी अद्याप दोघांनीही याबद्दल काहीही सांगितले नाही. पण आता सुशांतने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
वास्तविक, बॉलिवूड लाइफमधील या नात्याबद्दल बोलताना सुशांतसिंग राजपूत म्हणाला की ‘या क्षणी काहीही बोलणे योग्य नाही. लोकांनी इतक्या लवकर कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू नये. मी फक्त माझ्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. परंतु जर कोणाशी संबंध असेल तर प्रथम मला त्या दुसऱ्या व्यक्तीची परवानगी घ्यावी लागेल. त्याने दिलेल्या या संदिग्ध उत्तरामुळे कोठे तरी पाणी मुरते आहे, एवढे मात्र नक्की समजते आहे.
त्याच वेळी, तू कुणाला डेटिंग करतोय? असे जेव्हा सुशांतला विचारले तेंव्हा तर त्याने मजेदार उत्तर दिले. तो म्हणाला ‘मी बऱ्याच लोकांना डेट करत आहे. अरे देवा, मी असे म्हणायला नको होते. अहो, मी म्हणत असलेले दुसरे कोणीही असे म्हणू नये, असा खुलासाही त्याने केला. मात्र त्याच्या बोलण्यातून नेमके काय म्हणायचे होते, हे स्पष्ट झाले. सुशांत आणि रिया बऱ्याचदा एकत्र दिसतात. हे दोघेही एकत्र लडाख सहलीलाही गेले होते. यादरम्यान या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
सर्वात आगोदर सुशांतचे नाव अंकिता लोखंडेबरोबर जोडले जात होते. दोघे लग्नही करणार होते. पण गणित कोठे फिसकटले माहित नाही. त्यानंतर त्यानंतर कृती सेननबरोबर आणि सारा अली खानबरोबरही सुशांतचे नाव जोडले जात होते. यापैकी एकाही रिलेशनशीपमध्ये तो सिरीयस नव्हता हे स्पष्ट आहे. सुशांतचा पुढचा सिनेमा “छिछोरे’ आहे. त्यामध्ये त्याच्या बरोबर श्रद्धा कपूर असणार आहे.