Bachu Kadu । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करतात. मात्र यंदाच्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी मित्रपक्षच एकेमकांवर टीका करताना दिसून येत आहेत.
सर्वात चर्चेत असणारा मतदार संघ म्हणजे अमरावती. याठिकाणी उघडपणार प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांना विरोध दर्शवला आहे.
आता आणखी एक प्रहार बच्चू कडू यांनी केलाय. रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार बर्वे यांना पाठिंबा बच्चू कडू यांनी दिला आहे. यामुळे महायुतीमध्ये सर्व अलबेल नसल्याचा संदेश पुन्हा गेला आहे. अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यावरुन बच्चू कडू नाराज आहेत.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बच्चू कडू यांनी भेट घेत भावना सांगितल्या आहे. अशात आता अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना भाजपने लोकसभेचे उमेदवारी दिल्यावरून नाराज असलेल्या बच्चू कडूंनी आता रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला समर्थन जाहीर केले. म्हणजे बच्चू कडू भाजपशी जुळवून घेणार नाही, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहे.
हे वाचलं का ? विद्यार्थ्यांनी शरद पवारांकडे मांडल्या व्यथा,’MPSC चा घोळ, आता तुम्हीच सांगा, जगायंच कसं’