नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती उत्तम आहे आणि कोरोना संदर्भात त्यांची कोणतीही आरोग्य चाचणी करण्यात आलेली नाही असे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले आहे. ट्रम्प अनेक सभासदांच्या संपर्कात आले, आता त्यातले काही सभासद कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आले होते या भीतीने खबरदारी म्हणून स्वतंत्र्य कक्षात राहिले आहेत.
मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत तर दुसरीकडे सभासदांनाही कोरोना झाला आहे या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही त्यामुळे ट्रम्प यांची कोरोना विषाणू संदर्भात आरोग्य चाचणी करण्याची तूर्त आवश्यकता नाही असं व्हाइट हाऊसने म्हटले आहे.
ट्रम्प हे त्या सभासदाभांपासून लांब होते त्यांचा जवळून कोणाशीही संपर्क नाही असे व्हाइट हाऊसच्या सचिवांनी सांगितले आहे. ट्रम्प यांची तब्येत उत्तम आहे आणि डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत असेही सचिवांनी सांगितले आहे.