भवानीनगर- कबड्डी आणि इतर सर्व आपल्या मातीतल्या देशी खेळाला पुन्हा संजीवनी मिळण्याची गरज आहे, म्हणून देशी खेळांच्या सर्व स्पर्धा बारामती येथे आयोजित केल्या जात आहेत. त्या निमित्ताने तरी देशी खेळाकडे नवीन मुले वळली जातील, याच अपेक्षेने हे देशी खेळ मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे, असे मत बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
काटेवाडी (ता. बारामती) येथे अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन शनिवार (दि. 22) करण्यात आले आहो. या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सुनेत्रा पवार तसेच राष्ट्रीय कबड्डी खेळाडू नीता पाटील, रंजना पोतेकर, स्मिता खरात यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनंजय काळे, संदीप दळवी व सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेता पै. उत्कर्ष काळे, राष्ट्रीय खेळाडू ज्यूदो कृतिका कांबळे, राष्ट्रीय खेळाडू गोळाफेक शंतनू जाधव, राष्ट्रीय खेळाडू कबड्डी ओम काटे, आयुर्वेदिक डॉ. ही पदवी मिळवल्याने ऋतुजा काटे यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच धीरज घुले, तंटामुक्तीचे अध्यक्ष के.टी.जाधव, राजेंद्र पवार, संजय कोंडीबा काटे, सतिश देशमुख, राजू भिसे, रंजना लोखंडे, दत्तात्रय काटे, शितल काटे, पप्पू राऊत, मुख्याध्यापिका राणी ढमे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते.