मंचर – चास माऊलींची (ता.आंबेगाव ) येथील यशवंत तोडकर व मंदा तोडकर या शेतकरी दाम्पत्याने आपल्या गोठ्यातील गाभण असलेल्या गिरिजा या देशी गायीचे अगदी गर्भवती महिलेप्रमाणे डोहाळे जेवण व ओटीभरण केले आहे.
डोहाळे जेवणानिमित्त तोडकर दाम्पत्याने गिरिजा गायीला फुलांच्या माळांनी सजविले, गायीसाठी व जमलेल्या पाहुण्यांसाठी विविध खाद्यपदार्थ तयार केले होते.
डोहाळे जेवणासाठी जमलेल्या महिलांनी प्रथम गिरिजा या गायीचे औक्षण केले व नंतर ओटीभरण केले. त्यानंतर फळे व सुग्रास असे खाद्यपदार्थ खाण्यास दिले. शेवटी जमलेल्या पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घेऊन गायीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.