पिंपरी -राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज (दि. 17) सकाळी मेट्रोतून प्रवास करत मेट्रोच्या कामाची पाहणी केली. शरद पवार यांनी फुगेवाडी मेट्रो स्थानकाला भेट दिली. तिथून त्यांनी मेट्रोतून पिंपरी चिंचवड महापालिका मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास केला. आता यावरुनही राजकारण पेटल्याचं चित्र आहे. अशातच आता यावरुन भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का? पिंपरी चिंचवड मेट्रोची ट्रायल कुठल्याही स्थानिक खासदार, आमदाराला न कळवता राज्यसभेचे सदस्य शरद पवार यांच्या कशी होऊ शकते, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.