मुंबई-प्रसिद्ध मराठमोळा फॅशन डिझायनर नचिकेत बर्वे याच्या वडिलांनी हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ व रुग्णांसाठी घरून जेवणाचे डबे पुरवले. नचिकेत बर्वेचे वडील नामांकित सर्जन व हार्ट स्पेशलिस्ट आहेत. रविवारी जनता कर्फ्यू असताना त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ व रुग्णांसाठी ही सेवा पुरवली, अशी माहिती नचिकेत बर्वेने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवरुन दिली आहे.
जनता कर्फ्यूमुळे सर्व सेवा बंद असताना जेवणाची सोय करणे अवघड झाले होते. त्यामुळे त्यांनी स्वत: ही सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला. स्वत:च्या पत्नीला सांगून सगळे डबे तयार केले आणि रुग्णांची सेवा करणार्या कर्मचार्यांसाठी आणि रुग्णांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेले.
दरम्यान, नचिकेत बर्वे यांनी डॉ.काशीनाथ घाणेकर, तान्हाजी या चित्रपटासाठी फॅशन डिझायनर म्हणून काम केलं आहे. ते जरी फॅशन डिझायनर असले तरी यांच्या कुटुंबात सगळे डॉक्टर आहेत.
.