चांगल्या आरोग्यासाठी गोड फळे ही तितकीच महत्त्वाची आहेत. सुका मेव्यातील खजूर हे खूप चांगले. खजूरमध्ये विविध जीवनसत्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर आणि फायबर एक चांगला स्तोत्र आहे. कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम मोठया प्रमाणात असते.
1. खजूरमध्ये जीवनसत्वे असतात. हाडांची चांगली वाढ होते. तसेच खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्ततेमुळे कंबर दुखणे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्त असते.
2. खजूर खाल्ल्याने त्वचा चांगली राहते. खारीकमध्ये व्हिटॅमिन सी, डी असतात.
3. रात्री खारीक भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्यास ते आरोग्यासाठी चांगले. भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्या.
4. खजूरमध्ये पोटॅशियम आहे. त्यामुळे मेंदूची गती व दक्षता वाढवण्यासाठी मदत होते.
5. खजूर खाल्ल्याने हृदय आणि रक्तदाब पातळी नियंत्रित राहते.
6. गरोदरपणी खजूर खाल्ल्यास आईला चांगले दूध सुटते. त्यामुळे बाळाला पुरेसे पोषण मिळण्यास मदत होते.
7. वजन वाढवण्यासाठी खजूर मदत करतो. व्हिटॅमिन आणि प्रोटीन जास्त असतात. रोज 4 ते 5 खजूर खाण्यास सुरुवात केली तर वजन वाढेल.
8. बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. खजूर रात्रभर पाण्यात भिजून ते सकाळी खाल्याने त्याचा चांगला लाभ होतो. खजूरमध्ये सोल्यबल फायबर असतात.
9. ज्या लोकांना अशक्तपणा असतो. त्यांच्यासाठी खारीक खूप फायदेमंद आहे.
– डॉ.आदिती पानसंबळ, आहारतज्ज्ञ, नगर. संपर्क : 7385728886.