नवी दिल्ली – फोर्ड या वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीने आपले दोन्ही प्रकल्प अचानक बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या कंपनीची वाहने वितरण करणाऱ्या वितरकांचे धाबे दणाणले आहेत. या वितरकांनी 2 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे. ती गुंवणूक वाया जाण्याचा धाका निर्माण झाला असल्याचे वितरकांच्या संघटनेने म्हटले आहे.
वितरणासाठी वितरकांनी 2 हजार कोटी रूपयाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचबरोबर 40 हजार कर्मचाऱ्यांना रोजगार दिला आहे. आता कंपनीचे उत्पादन बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
या कंपनीचे देशात 170 डिलर आणि 391 आउटलेटस् आहेत. त्यांच्याकडे सध्या कंपनीकडून विकत घेतलेली 1 हजार वाहने आहेत. त्याची किंमत 150 कोटी रुपये इतकी आहे. पाच महिन्यापुर्वीच कंपनीने अनेक वितरकांची नियुक्ती केली होती. त्यांची मोठी गुंतवणूक वाया जाणार असल्याचे फेडरेशन ऑफ डिलर्स असोशिएन या संघटनेचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले.
कंपन्या अचानक उत्पादन बंद करतात. त्यामुळे वितरकांवर मोठा परिणाम होतो. यासाठी अशा परिस्थितीत वितरकांना नुकसान भरपाई देण्याची यंत्रणा विकसित करण्याची गरज असल्याचे या संघटनेने अनेकदा सरकारला सांगिले आहे.
इतर बऱ्याच देशात अशी यंत्रणा विकसित करण्याता आली असल्याचे या संघटनेने म्हटले आहे. 2017 पासून 5 मोठ्या कंन्यानी अचानक उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्याच्या वितरकांना काही संरक्षण देण्याची यंत्रणा विकसित करण्याची गरज असल्याचे या विषयावरील सांसदीय समितीने या अगोदर सांगितले आहे.