पुणे – कामगार दिन आणि रमजान ईदचे औचित्य साधून कोरेगाव पार्क येथे अविरत सेवा फाऊंडेशन आणि डॉन बॉस्क सुरक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने वस्तीतील घरेलू कामगार तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महिल आणि पुरुषांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
कोरेगाव पार्क येथील डॉन बॉस्को युथ सेंटरच्या कार्यालयात रेशन कीट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉन बॉस्को संस्थेचे रेक्टार ई.एन. डॉल्टन, सामाजिक कार्यकर्ते ऍड. रवींद्र रणसिंग, रवींद्र देशमुख, ऑसबन फुर्ताडो आणि डॉन बॉस्को सुरक्षाच्या प्रकल्प व्यवस्थापक तेहसीन शेख उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थितांना ५० किराणा किटचे वाटप करण्यात आले. तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हडपसर, कोरेगाव पार्क येथील रेणुका वस्ती, लेबर कॅम्प भागातील कामगार यावेळी उपस्थित होते.