हिंजवडी, (वार्ताहर) – आपुलकी दिव्यांग सेवा फाउंडेशन व वाकड येथील रणजित (आबा) कलाटे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रपाणी वसाहतमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त गरजू दिव्यांग महिलांना गॅस शेगडी व अन्य घरगुती वस्तूंचे वाटप करत त्या दिव्यांग महिलांचा गौरव करण्यात आला.
या वेळी रणजित (आबा) कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा कलाटे यांनी उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, दिव्यांग या शब्दाला आपण कर्तृत्वाच्या जोरावर नामोहरम केले आहे. तुमच्या जिद्दीला बघून आम्हाला जगण्याची आणि काही करून दाखविण्याची प्रेरणा व ऊर्जा मिळते.
या वेळी युवा नेते रणजित कलाटे, फाउंडेशनच्या महिला सदस्या हर्षा चौधरी, विशाखा भागवत, दर्शना कलाटे, योगिता नांद्रे, महावीर गांधी, रणजित मानकर, अक्षय वाघमोडे उपास्थित होते.
आपुलकी दिव्यांग सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विजय पगडे यांनी दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची व योजनांची माहिती दिली. संजय वाघमारे व इसाक आतार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. फाउंडेशनच्या सचिव जयश्री धायबर, सविता मोरे यांनी आभार मानले.