नीरा -सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. यासाठी सर्वजण आपापल्या पद्धतीने करोनाविरोधात लढा देत आहेत. अशावेळी आपला वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत नीरा येथील भैय्यासाहेब खाटपे यांनी पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासनाला हॅन्डग्लोव्हजचे वाटप केले.
खाटपे हे अनेक सामाजिक कामात अग्रेसर असतात. बुधवारी (दि. 17) त्यांचा वाढदिवस होता. यावर्षी त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता करोना युद्धामध्ये रणांगणात उतरून लढाई करणाऱ्या योद्ध्यांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने पुरंदर तालुक्यातील नीरा, बेलसर, वाल्हे, परिंचे, माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय सासवड, जेजुरी. सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन नीरा औट पोस्ट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सासवड या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी दोन हजार हॅन्डग्लोव्हजचे वाटप केले.
प्रशानातील सर्व अधिकारी, कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत असतात, अशावेळी करोना रुग्णांशी त्यांचा संपर्क होऊ शकतो. त्यांच्या सुरक्षितेसाठी त्यांना मास्कबरोबरच हॅन्डग्लोव्हज वापरणे गरजेचे आहे.