मंचर- आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील मयुर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना दिवाळीनिमित्त मोफत किराणा भुसार मालाचे वाटप करण्यात आले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र जंगम आणि व्यवस्थापक एम. एस. गावडे यांनी दिली. या प्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष हरिदास रामवत, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, बापू अभ्यंकर, संस्थेचे ज्येष्ठ सभासद आनंद पाटील भोर, जालिंदर इंदोरे, इब्राहिम शेख, सुभाष टेमकर, सोमकांत खोल्लम, मनोज काळदंते, शैलेश भालेराव, शामल चासकर, भगवंत भोर उपस्थित होते. पतसंस्थेच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून दिवाळीनिमित्त साखर, तेल, रवा, मैदा, पोहे, मोती साबण, बेसन पीठ, चकली मसाला, उटणे इत्यादी किराणा मालाचे वाटप करण्यात येते. संस्थेच्या 609 सभासदांना याचा लाभ मिळाला आहे.
पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सभासदांसाठी बुधवारी (दि. 6) काशी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेने सभासदांसाठी एक लाख रुपयांचा अपघात विमा उतरविला असून, 25 सभासदांच्या कुटुंबांना याचा फायदा झाला आहे.