श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- समाजाचे रक्षण व सुरक्षितता व शांततेसाठी रेड क्रॉसचे जगात योगदान मोठे आहे. व्यक्तीचे जीवन आनंदी व निरोगी राहण्यासाठी रेड क्रॉस आरोग्य विषयक विविध उपक्रम सतत राबवत असते. श्रीरामपूर रेड क्रॉस सोसायटीनेही राज्यस्तरावर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे, ही अभिमानाची बाब आहे.
रेड क्रॉस सदस्यांना आता आपत्ती काळात प्रेरणा मिळावी, यासाठी जॅकेट देण्यात येत आहेत. कुठलीही वर्दी अंगात असल्यास काम करण्याची डबल ऊर्जा मिळते. आपल्या कार्यातून रेड क्रॉस सेवेचा व समर्पणाचा आदर्श समाजात निर्माण करावा, असे आवाहन रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी केले.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी राज्य शाखेने दिलेल्या जॅकेटचे वाटप आजीव सभासदांना प्रांताधिकारी किरण सावंत यांचेहस्ते करण्यात आले. त्यावेळी किरण सावंत सभासदांना मार्गदर्शन करत होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष तथा तहसीलदार मिलिंद वाघ, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे उपस्थित होते. प्रास्तविकात सचिव सुनील साळवे यांनी रेड क्रॉसच्या भविष्यकालीन योजना व विकासाची घोडदौड याविषयी माहिती दिली.
सर्व सदस्यांना प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंद वाघ यांचेहस्ते जॅकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी आजीव सभासद प्रवीण साळवे, पोपटराव शेळके, श्रावण भोसले, भरत कुंकुळोल, सुरेश वाघुले, सचिन चंदन, विश्वास भोसले, नानासाहेब मुठे, कांतिलाल शिंदे, विपुल गागरे, केशव धायगुडे, गणेश थोरात,
बदर शेख, राजेंद्र केदारी, ज्ञानदेव माळी, महेंद्र भराड, गोरक्षनाथ बनकर, श्रीकांत दहिमिवाल, अवधूत कुलकर्णी, संदीप छाजेड, सुखदेव शेरे, प्रकाश मेटकर, सूरंजन साळवे, पुष्पाताई शिंदे, शोभा शेंडगे, सविता साळुंके, निर्मला लांडगे, आदिती मेतकर,रोहित वाघुले, श्याम हेलकुटे, मधुकर वेडे आदी आजीव सभासद उपस्थित होते.