आदिवासी वस्त्यांवरील शाळांमध्ये सायकलीचे वाटप 

पुणे : कित्येक मैल पायी प्रवास करुन शिक्षण घेण्यासाठी येणा-या आदिवासी वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना पुणेकरांतर्फे सायकली आणि  खेळणी भेट म्हणून देण्यात आली.
पुण्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पौड परिसरात अनेक आदिवासी पाडे आजही आहेत. तेथील मुले जवळच्या जिल्हापरिषद शाळांमध्ये ऊन-पावसाची तमा न बाळगता शिकायला पायी जातात. त्यांच्याकरीता ही भेट देण्यात आली.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्या पुढाकाराने मंडईतील प्रसिद्ध व्यावसायिक रमेशभाई पटेल यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम पौड परिसरातील जिल्हा परिषद शाळा सुतारवाडी येथे घेण्यात आला.
यावेळी रमेशभाई पटेल, शैलेश पटेल, आरती पटेल, मंडळाचे अध्यक्ष पियुष शाह, आदी उपस्थित होते. रमेशभाई पटेल यांचा पुणेरी पगडी घालून सन्मान करण्यात आला. निलेश सुतार यांनी सूत्रसंचालन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.