मुंबई – अभिनेत्री ‘दिशा पटानी’ ही बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असते. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटामधून अभिनेत्री दिशा पटानी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.
दिशाचा फॅशन सेन्स इतका कमाल आहे की कोणत्या वेळी काय परिधान करावे, आणि लक्ष कसे वेधून घ्यावे हे तिला बरोबर माहीत आहे. आणि म्हणूनच दिशा बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्स सोबत शेअर करते. आणि फॅन्स देखील तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रेम देतात.
नुकतंच अभिनेत्री ‘दिशा पटानी’ने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला असून, तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. दिशा स्विमिंग पूलच्या बाजूला पोज देत आहे. काळ्या बिकिनीमध्ये ती तिची टोन्ड फिगर फ्लॉन्ट करत आहे. सेलिब्रिटींपासून ते चाहते तिच्या या पोस्टवर तिच्या हॉटनेसचे कौतुक करत आहेत.
सेलिब्रिटींनी केल्या कमेंटन्स…
टायगर श्रॉफची बहीण आणि दिशाचा मित्र कृष्णा श्रॉफने या फोटोवर कमेंट केली आहे. त्यांनी लिहिले की, ‘दिशा बरोबर आहे, मला तेच म्हणायचे आहे.’ पुढे त्याने हसण्याचा इमोजी बनवला. मौनी रॉय लिहिते, ‘स्टनर.’तर एक चाहता म्हणतो, ‘दिशा मॅम, तुझा हॉटनेस पाहून लोक मरायला तयार असावेत.तर एकाने लिहिलंय कि ‘दिशा इतकी क्यूट का आहे?’