मुंबई – अभिनेत्री दिशा पटानी तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. याशिवाय तिच्या स्टाईलने तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. फिटनेस आणि बोल्ड फोटशूटमुळे ती विशेष चर्चेत आली आहे. अभिनेता टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती आता अलेक्झांडर इलिला डेट करत असल्याचे म्हंटले जात आहे. अनेकदा ते एकत्र स्पॉट झाले आहे. आता पुन्हा एकदा हे दोघे एकत्र एका पार्टीत दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिशा हॉट रिवीलिंग ड्रेसमध्ये दिसत असून तिच्यासोबत अलेक्झांडर देखील दिसत आहे. विशेष म्हणजे ती तिथ असलेल्या लोकांना तो व्यक्ती तिचा बॉयफ्रेंड आहे असं सांगत असल्याचे दिसते. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तिने रिलेशनशीपबाबत मोठा खुलासा केला आहे. इतकेच काय तर या पार्टीमध्ये एक्स बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ देखील उपस्थित होता.
यापूर्वी देखील दिशा आणि अलेक्झांडर डिनर डेटवर गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात दिशा अलेक्झांडर इलिकसोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना देखील दिसली. दोघांनीही डिनरचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. नव्या व्यक्तीसोबतच्या डिनर डेटमुळे दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली होती. त्यानंतर आता ते दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे. मात्र अद्यापही दोघांनी अधिकृतपणे आपल्या नात्याबद्दल माहिती दिलेली नाही.
View this post on Instagram
दरम्यान, अलेक्झांडर हा व्यवसायाने जिम ट्रेनर, अभिनेता आणि मॉडेल आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दिशा सध्या ‘कांगुवा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच ती योद्धा आणि ‘कल्की 2898 एडी’ अशा बिग बजेट सिनेमांमध्ये दिसणार आहे.