नवी दिल्ली – महिलांनी कपडे कसे घालावे, यावर समाजात नेहमीच चर्चा होते. तोकड्या कपड्यांचं सोडा, महिला स्वत:च्या घरातही सुरुक्षीत नसल्याची अनेक प्रकरणं समोर येतात. उत्तर प्रदेशात एका बापाने नुकतच लग्न झालेल्या आपल्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्वतःच्या लग्न झालेल्या लेकीवर वडिलांनी बलात्काराचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मुलीचा नुकताच विवाह झाला होता.
लग्न झाल्यानंतर मुलगी आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी माहेरी आली होती. मुलगी घरात झोपलेली असताना वडिलांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पीडित मुलगी सोमवारी घरात झोपलेली होती. आरोपी वडील दारू पिऊन घरी आले. त्यावेळी त्यांनी मुलीला वाईट हेतून हात लावायचा प्रयत्न केला. तसेच धमकी देऊन तोंड बंद ठेवायला सांगितलं. मात्र मुलीने आरडाओरडा केला आणि आईला सगळा प्रकार लक्षात आला.
पीडित मुलीने सांगितले की, याआधीही तिच्यावर वडिलांनी लैंगिक अत्याचार केले होते. मात्र तिने त्याची कधीच वाच्यता केली नाही. तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीला अटक केली तेव्हा तो दारूच्या नशेत होता.