सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमधून आणि करोना केअर सेंटरमधून शनिवारी संध्याकाळपर्यंत 809 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर 921 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 17, कराड उपजिल्हा रुग्णालय 14, फलटण उपजिल्हा रुग्णालय 51, कोरेगाव 22, वाई 138, खंडाळा 77, रायगाव 141, पानमळेवाडी 102, मायणी 65, महाबळेश्वर 40, दहिवडी 42, खावली 23 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 189 अशी एकूण 921 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.