मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेते ‘दिलीप कुमार’ त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटत असतात. ते त्यांच्या तब्येतीबद्दल अनेकदा याच माध्यमातून अपडेटही देतात. दरम्यान, यावेळी दिलीप कुमार यांच्या चाहत्यांना काहीशी काळजीत पाडणारी बातमी समोर आली आहे.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि दिग्ज अभिनेत्री सायरा बानो यांनी सांगितलं की, सध्या दिलीप कुमार यांची तब्येत अतिशय अशक्त आहे. रोगप्रतिकारशक्तीही कमी झाली आहे. अनेकदा ते हॉलपर्यंत येतात आणि लगेचच त्यांच्या खोलीत जातात. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचं सायरा बानो यांनी चाहत्यांना म्हटलं आहे.
दरम्यान, यावर्षी 2020 मध्ये दिलीप कुमार यांच्या दोन भावांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. अश्यात दिलीप कुमार यांची सुद्धा तब्येत खालावल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाला 54 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही या दोघांचं प्रेम कायम आहे. सायरा बानो पतीची दिलीप कुमार यांची निष्ठेने काळजी आणि देखभाल करत आहेत.