पुणे – तब्बल 189 वर्षांची समृध्द परंपरा असलेल्या पीएनजी ज्वेलर्सतर्फे ग्राहकांसाठी डिजिटल गोल्ड सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेद्वारे www.pngjewellers.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून ग्राहकांना डिजिटल सोने खरेदी आणि विक्री करणे शक्य होणार आहे. यासाठी ब्रॅंडने डिजिटल गोल्ड क्षेत्रात अग्रणी असलेल्या ऑगमॉंटसोबत करार केला आहे.
डिजिटल गोल्ड सुविधेमुळे वास्तविक सोने व चांदी बुलियन ऑनलाईन उपलब्धततेच्या सोयीस्कर मार्गाने व अगदी एक रूपया इतक्या कमी मूल्यापासून खरेदी करता येणार आहेत. त्यानंतर खरेदी केलेली नाणी किंवा बार्सच्या डिलिव्हरीसाठी ग्राहक हवी तेव्हा विनंती करू शकतात.
ऑनलाईन व्यवहाराची तीच लिंक वापरून ग्राहक सुरक्षित व सोयीस्कर पध्दतीने बुलियनची विक्री करू शकतात. खरेदी आणि विक्रीचे दर होलसेल स्पॉट रेटवर आधारित असून ही व्यवहार्य आहेच; पण त्याचबरोबर इतर सेवा पुरवठादार यांच्या तुलनेत स्पर्धात्मक देखील आहे.
याशिवाय ग्राहक आपल्या स्नेहींना कुठल्याही समारंभासाठी सोने किंवा चांदी भेट देऊ शकतात. यासाठी ज्यांना भेट द्यायची आहे किंवा प्राप्तकर्त्यांकडे सक्रिय मोबाईल क्रमांक असण्याची गरज आहे. प्राप्तकर्त्याने ही भेट 7 दिवसांच्या आत स्वीकारायची असून ती न केल्यास ग्राहकाच्या वॉलेटमध्ये ही खरेदी पुन्हा ठेवली जाते.
पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, ऑगमॉंटच्या सहकार्याने ‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे सुरू करण्यात आलेले डिजिटल इंटरफेस ग्राहकांसाठी सोयीस्कर व अखंड खरेदी विक्रीचा अनुभव प्रदान करते. गेल्या दोन वर्षांत ग्राहकांमध्ये ई-कॉमर्सबाबत जागरूकता वाढली असून त्यामुळे डिजिटल गोल्ड साठी व्यासपीठ तयार करणे हा स्वाभाविकच पुढचा टप्पा आहे. खरेदी मुल्यावर कुठलीही मर्यादा नसल्यामुळे ग्राहकांना सोन्यासह आपला गुंतवणूक संच निर्माण करण्यासाठी मोठी संधी आहे.