पुणे – भारतातील विश्वसनीय ज्वेलरी ब्रॅंडपैकी एक असलेल्या पीएनजी ज्वेलर्स तर्फे पुण्यातील आपल्या 11 व्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या नवीन दालनासह पीएनजी ज्वेलर्सच्या जगभरातील दालनांची संख्या आता 34 झाली आहे.
उद्घाटनप्रसंगी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ, संचालक पराग गाडगीळ आणि भाडळे, बोरा, शिंघवी, सुराणा व पापडीवाल कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
हे नवीन दालन 2000 स्क्वेअर फूट जागेत विस्तारलेले असून यामध्ये पीएनजीच्या सोने, चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी असेल. वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळ मोक्याच्या ठिकाणी असलेले हे दालन परिसरातील ग्राहकांना सेवा देईल.
याप्रसंगी सौरभ गाडगीळ म्हणाले की, वाघोली येथील दालनामध्ये 15 मे पर्यंत मोअर गोल्ड,मोअर हॅपिनेस ही मोहिम राबविण्यात येईल. या मोहिमेदरम्यान, वाघोली येथील ग्राहक सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर मोफत अतिरिक्त सोन्याचा आनंद घेता येऊ शकतो. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर, प्रत्येक 10 ग्रॅम खरेदीसाठी, सर्व ग्राहकांना अतिरिक्त 100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे पूर्णपणे विनामूल्य मिळणार आहे.
म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकाला 100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे मोफत मिळेल आणि 20 ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकाला 100 मिलीग्रॅमची 2 सोन्याची नाणी मोफत मिळणार आहेत. किमान रु. 50,000/-च्या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर प्रत्येक ग्राहकाला 100 मिलीग्रॅमचे 1 सोन्याचे नाणे पूर्णपणे मोफत मिळेल आणि 50,000/- च्या प्रत्येक अतिरिक्त खरेदीसाठी 100 मिलीग्रामचे अतिरिक्त सोन्याचे नाणे मिळणार आहे. ग्राहक या ऑफरचा लाभ वास्तविक सोन्याची नाणी किंवा त्यांच्या डिजिटल गोल्ड वॉलेटसमध्ये त्याच मुल्याचे डिजिटल गोल्ड देखील घेऊ शकतात.