नगर – दारू विक्रीसाठी लागणारा परवाना नियमानुसार मिळाला नसून, त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रार करून तुझे हॉटेल व परवाना रद्द करतो, अशी धमकी देत संबंधिताकडे तीन लाखांची खंडणी मागणारा हिंदू राष्ट्रसेनेचा जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंट्याल याला एक लाखाची खंडणी घेताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.
दिगंबर गेंट्याल याने माहिती अधिकारात अर्ज करून दारू विक्रीसाठी लागणाऱ्या परवान्याबाबत माहिती मिळविली. त्यानुसार संबंधित अर्जदाराला हॉटेल सुरू ठेवायचे असेल, तर तीन लाखांची खंडणी दे, नाही तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करेल, अशी धमकी देत होता. त्यानुसार संबंधित तक्रारदाराने पोलीस अधीक्षक